Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Balaji Sherekar
अंबाजोगाई: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी संस्थानला एका निनावी भक्ताकडून १ कोटी रुपयांची भरघोस देणगी प्राप्त झाली आहे. मुंबईतील या दानशूर भक्ताने आपली ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही मदत सुपूर्द केली असून, या दातृत्वामुळे मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शिखराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार योगेश्वरी देवी मंदिराचे मुख्य शिखर ऐतिहासिक असून ते पूर्णपणे चुन्याच्या बांधकामातील आहे. मात्र, १०० वर्षांहून अधिक काळ लोटल्याने आणि काळाच्या ओघात हे शिखर काहीसे कमकुवत झाले होते. या शिखराच्या दुरुस्ती आणि संवर्धनासाठी सुमारे ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली होती. ही…
बीड जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक, अँटी रेबीज लसींचाही तुटवडा मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सभागृहात बोलताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील त्रुटींवर बोट ठेवत सरकारकडे तातडीने निधी आणि उपाययोजनांची मागणी केली. त्यांनी प्रामुख्याने एपीएल केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मिळणारे अनुदान, आरोग्य केंद्रांमधील लसींचा तुटवडा आणि रिक्त पदे या विषयांवर सरकारचे लक्ष वेधले. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संदर्भात बोलताना नमिता मुंदडा यांनी सांगितले की, केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील एपीएल केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी…
अंबाजोगाई: केज विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सरकारकडे धाव घेतली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. २२ आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, बाजरी आणि भाजीपाला पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. काढणीस आलेली पिके शेतातच आडवी पडल्याने आणि पावसामुळे…
परळी (प्रतिनिधी): नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), बीडच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका वारस प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना मुंडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या कामासाठी ‘एअर (वारस) प्रमाणपत्र’ हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, आज तहसील कार्यालयातच सापळा रचण्यात आला. २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरल्यानंतर, एसीबीच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई करून मुंडे यांना ताब्यात घेतले. व्यंकटेश मुंडे यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच…
अंबाजोगाई शहरात गेल्या 13 वर्षापासून अखंडित व अविरतपणे मधुमेही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. अतुल शिंदे यांना राष्ट्रीय स्तरावर मधुमेही रुग्णांसाठी काम करणाऱ्या डायबिटीज इंडिया संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील डायबिटीज अवेरनेस अवॉर्ड – 2026 नुकताच जाहीर करण्यात आला होता त्याचे वितरण शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ.अतुल शिंदे यांचे मधुमेह क्षेत्रातील कार्य हे अतुलनीय ठरल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.डॉ.अतुल शिंदे यांनी १३ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागात योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर या नावाने पायाभरणी केली. 13 वर्षाची अखंड मेहनत व मधुमेही…
अंबाजोगाई: महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा लाभलेले शेखर मुंदडा यांनी अंबाजोगाई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समाजकारण आणि राजकारणाची योग्य सांगड घालण्याचे आवाहन केले. आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी आयोजित या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा कार्यकर्त्यांसमोर मांडला. अध्यात्म, सेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत काम करताना लोकहित कसे जोपासावे, याचे जिवंत उदाहरण त्यांनी आपल्या भाषणातून दिले. मुंदडा यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रामुख्याने गोवंश रक्षा आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी वाचवण्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून गेल्या चार वर्षांत साडेपाच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. या माध्यमातून…
युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत गरजू बालकांना मिळाला मायेचा आधार अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने जन्मत: वाकडे पाय (क्लबफूट) असलेल्या बालकांसाठी विशेष उपचार साहित्याचे वाटप करण्यात आले. पन्नगेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम पार पडला. अंबाजोगाई शहरात सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लबने हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे अक्षय मुंदडा यांनी यावेळी नमूद केले. अनेकदा योग्य उपचारांच्या अभावी किंवा साहित्याच्या कमतरतेमुळे बालकांचे अपंगत्व कायम राहण्याची भीती असते. मात्र, अशा प्रकारच्या मदतीमुळे या बालकांचे पाय सरळ होऊन त्यांना भविष्यात सन्मानाने जगता येईल. समाजातील…
अंबाजोगाई/प्रतिनिधीअंबाजोगाई शहरात गेल्या 13 वर्षापासून अखंडितपणे मधुमेह आजारावर उपचार करणारे आणि तळागाळात जनजागृती करणारे मधुमेह तज्ञ डॉ.अतुल शिंदे यांनी गेल्या 13 वर्षामध्ये हजारो रुग्णांची मोफत तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले तर अनेकांना त्यांच्या माध्यमातून मधुमेह आजाराचे निदान झाले. डॉ.अतुल शिंदे यांचा व्यापक कार्याची दखल घेवून देशभरात मधुमेह आजारावर काम करणारी संघटना डायबेटिज इंडियाच्या वतीने डायबेटिज अवेेरनेस इनिशेटिव्ह अॅवॉर्ड 2026 जाहिर करण्यात आला असून त्याचे वितरण येत्या शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथे होणार आहे. डॉ.अतुल शिंदे यांना हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.मधुमेह तज्ञ डॉ.अतुल शिंदे यांनी योगेश्वरी डायबेटिज केअर सेंटरच्या माध्यमातून गेली 13 वर्ष अखंडितपणे…
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील रेडिओलॉजी विभागाचे पुनरुज्जीवन रात्रीच्या वेळी आपत्कालीन सोनोग्राफी आता होणार शक्य, आ.नमिताताई अक्षय मुंदडा आणि नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिओलॉजी विभागात तब्बल २३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पदव्युत्तर पदविका (PG DNB) प्रवेश प्रक्रियेला यशस्वी सुरुवात झाली असून, एकूण तीन जागांपैकी दोन जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा आणि अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे रुग्णालयात एमआरआय सुविधा कार्यान्वित होऊन प्रोफेसर पदाची नियुक्ती झाली आहे. यामुळे आता रुग्णांना आपत्कालीन स्थितीत रात्रीच्या वेळी देखील सोनोग्राफीची सेवा उपलब्ध होणार असून आरोग्य सुविधेत मोठी भर पडली…
अंबाजोगाई / प्रतिनिधी: केज मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हनुमंत पिंप्री (ता. केज) येथील ३३ केव्ही उपकेंद्रात १० MVA (33/11KV) क्षमतेचा नवीन विद्युत रोहित्र (Transformer) आज दाखल झाला आहे. या नवीन रोहित्राच्या कार्यान्वयनामुळे हनुमंत पिंप्री परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा विजेचा प्रश्न सुटणार असून, त्यांना आता दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार हनुमंत पिंप्री आणि आसपासच्या गावांमध्ये शेतीसाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. जुन्या यंत्रणेवर येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे अनेकदा वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज मिळणे अशा समस्या उद्भवत होत्या. तसेच, रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करत शेतात पिकांना…
