Author: Balaji Sherekar

आ. नमितताई मुंदडा यांच्या प्रयत्नांवर अंतिम शिक्कामोर्तब अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नवीन ‘जिल्हा कारागृह वर्ग-१’ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. बीड येथील एकमेव जिल्हा कारागृहावर वाढलेला ताण कमी करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी या कारागृहाच्या मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले असून ५ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना राज्य राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा अधिनियम २०२५ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने हे नवीन…

Read More

आ. नमिता मुंदडा यांचे सहकार्य आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचा पाठपुरावा ठरला निर्णायक अंबाजोगाई: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ८१० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यासाठी २० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये अंबाजोगाई शहराला सर्वाधिक २७८ घरकुलांचा लाभ मिळाला आहे. आमदार नमिता मुंदडा यांचे विशेष सहकार्य आणि नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंबाजोगाईसाठी हा मोठा निधी प्राप्त करणे शक्य झाले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ३० चौरस मीटरचे घर बांधण्यासाठी…

Read More

अंबाजोगाई: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत बांधकामाच्या १४ कोटी ९९ लाख ७५ हजार ४०६ रुपयांच्या निधीस प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे या कार्यालयाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम आधीच पूर्ण झाले असून त्या ठिकाणी सध्या नियमित कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या भक्कम पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री स्व. विमलताई मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून आणले होते. यामुळे अंबाजोगाईसह सहा…

Read More

अंबाजोगाई: गोव्याची राजधानी पणजी येथे ८ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र – ७ (पश्चिम विभाग) च्या वार्षिक परिषदेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्राच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवत आपले प्रभावी प्रतिनिधित्व सिद्ध केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उच्चस्तरीय परिषदेत ‘विकसित भारत – २०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करताना युवा लोकप्रतिनिधींची भूमिका आणि प्रादेशिक विकासाचे विविध पैलू यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. या परिषदेसाठी देशभरातील ज्या मोजक्या आणि निवडक आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते, त्यामध्ये आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश होता, ही बाब त्यांच्या…

Read More

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी सादर केला होता प्रस्ताव अंबाजोगाई: शहराच्या नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या ७५ लाख १ हजार २७६ रुपयांच्या विविध विकासकामांना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रलंबित नागरी कामांचा मार्ग मोकळा झाला असून प्रभाग क्रमांक ४ आणि ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार नमिता मुंदडा आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी या विकासकामांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेने…

Read More

पुण्यात राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केल्या महत्वपूर्ण शिफारशी अंबाजोगाई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांविषयी पुनर्गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे ४ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थित राहून ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्यातील ऊसतोड महिलांच्या अनावश्यक शस्त्रक्रियांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यांना सुरक्षित आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस धोरण राबवावे, अशी आग्रही भूमिका मुंदडा यांनी यावेळी मांडली. बैठकीदरम्यान ऊसतोड महिलांच्या आरोग्याचे संरक्षण, अनावश्यक शस्त्रक्रियांवर कडक नियंत्रण आणि ग्रामीण भागातील महिलांना योग्य…

Read More

आ. नमिता मुंदडा यांची विधानसभेत आग्रही मागणी मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान मराठवाड्यातील पूरपरिस्थिती आणि त्या काळात गर्भवती महिलांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचा प्रश्न आमदार नमिता मुंदडा यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला. अतिवृष्टी आणि पुराच्या काळात संपर्क तुटल्यामुळे गर्भवती महिलांना, विशेषतः ज्यांची प्रकृती जोखमीची (हाय-रिस्क प्रेग्नन्सी) आहे, त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सरकारने विशेष आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सभागृहात बोलताना आमदार मुंदडा यांनी वस्तुस्थिती मांडली की, पुराच्या काळात रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रुग्णवाहिका संबंधित गावांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा गर्भवती महिलांना…

Read More

अंबाजोगाई: येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ११०० खाटांचे नवीन अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी या रुग्णालयासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि शासनदरबारी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीला यामुळे मोठे यश मिळाले आहे. या नवीन रुग्णालयामुळे अंबाजोगाई आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधा त्यांच्या हक्काच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देताना मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद…

Read More

​बीड: दि. २ मार्च २०२६ बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व अधीनस्थ उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘कृषी स्पंदन’ हा कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.​दोन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल​हा महोत्सव दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत कला आणि क्रीडा गुणांचे प्रदर्शन केले. यामध्ये विविध स्पर्धा, नृत्य, गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.​दिमाखदार उद्घाटन सोहळा​महोत्सवाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या मतदारसंघातील शिक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नांवरून सरकारचे लक्ष वेधले. सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत त्यांनी केज येथील १९५२ पासून सुरू असलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही ऐतिहासिक वारसा असलेली संस्था असून १९५२ पासून या शाळेने हजारो अधिकारी, इंजिनिअर्स आणि डॉक्टर घडवले आहेत. एकेकाळी १८०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत २०२३ पासून पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत शिक्षक पदे कमी करण्यात आली आणि अखेर शाळा…

Read More