या प्रदर्शनामध्ये विविध जातींच्या श्वानांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे हस्की, ग्रेट डेन, डोबरमन, लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, जर्मन शेफर्ड, चाऊ-चाऊ, पिटबुल, कॅने कोर्सो अशा देशी-विदेशी आणि आकर्षक जातींचे श्वान पाहायला मिळाले. एकूण १०४ कुत्र्यांचा सहभाग या स्पर्धेत होता. विविध जातींच्या श्वानांमुळे प्रदर्शन अधिक रंगतदार व आकर्षक झाले.
या भव्य उपक्रमाचे आयोजन लोकनेते सुनीलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा लोमटे, जयदीप चिल्मे, डॉ. शिंदे, अशोक ढगे तसेच संस्थेच्या इतर सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस ₹५००० हे मा. लोकांडे सर यांच्या कुत्र्याने पटकावले.
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ₹३००० हे मा. काळे यांना मिळाले.
तृतीय क्रमांकाचे बक्षीस ₹१००० हे मा. देशमुख यांनी जिंकले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. अनिल केंद्रे (अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन, अंबाजोगाई),
डॉ. दत्ता मसनें (अतिरिक्त आयुक्त, लातूर),
डॉ. सुदर्शन मुंडे (अतिरिक्त आयुक्त, जाफराबाद)
हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बाळासाहेब लोमटे (THO, अंबाजोगाई) यांनी भूषविले. तसेच डॉ. अक्षय मुसळे, डॉ. विवेक गिरी, डॉ. बाबासाहेब शिंदे यांनीही या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
शहर पातळीवर प्रथमच अशा प्रकारच्या कुत्रा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यामुळे सर्व पाळीव प्राणी मालक व श्वानप्रेमींमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात आला. अंबाजोगाई शहरात अशा उपक्रमांची सुरुवात झाल्याने भविष्यातही अशाच कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली..

