अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात गेल्या 13 वर्षापासून अखंडितपणे मधुमेह आजारावर उपचार करणारे आणि तळागाळात जनजागृती करणारे मधुमेह तज्ञ डॉ.अतुल शिंदे यांनी गेल्या 13 वर्षामध्ये हजारो रुग्णांची मोफत तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले तर अनेकांना त्यांच्या माध्यमातून मधुमेह आजाराचे निदान झाले. डॉ.अतुल शिंदे यांचा व्यापक कार्याची दखल घेवून देशभरात मधुमेह आजारावर काम करणारी संघटना डायबेटिज इंडियाच्या वतीने डायबेटिज अवेेरनेस इनिशेटिव्ह अॅवॉर्ड 2026 जाहिर करण्यात आला असून त्याचे वितरण येत्या शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथे होणार आहे. डॉ.अतुल शिंदे यांना हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मधुमेह तज्ञ डॉ.अतुल शिंदे यांनी योगेश्वरी डायबेटिज केअर सेंटरच्या माध्यमातून गेली 13 वर्ष अखंडितपणे कार्य करत आहेत. दरवर्षी मधुमेह दिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहर व परिसरातील जे गोरगरीब व सर्वसामान्य रुग्ण आहेत अशांसाठी मोफत रक्ततपासणी, निदान व मोफत उपचार शिबीराचे आयोजन करतात. या शिबीरात जवळपास 1500 ते 2000 रुग्णांची तपासणी केली जाते. आजवर 22 हजाराच्या आसपास रुग्णांची तपासणी 13 वर्षात शिबीराच्या माध्यमातून केली आहे. तर दररोजच्या ओपीडीच्या माध्यमातून असंख्य रुग्णांची तपासणी केली जाते . आजपर्यंत डॉ.शिंदे यांचे रेकॉर्ड जिल्ह्यातील किंवा मराठवाडयातील एकाही मधुमेह तज्ञांच्या नावावर नाही. ही किमय्या डॉ.अतुल शिंदे यांनी साधली आहे. त्यांच्या व्यापक कार्याचा विचार आणि मधुमेह आजारासंबंधी योग्य असे समुपदेशन आणि जनजागृती करण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहे. त्यांच्या कार्याचा विचार करुन देशभरात मधुमेह आजार नियंत्रणात आला पाहिजे आणि त्यासाठी जनजागृती करणारी संस्था म्हणजे डायबेटिज इंडिया. या संस्थेने डॉ.अतुल शिंदे यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान म्हणून त्यांना सन 2026 सालचा डायबेटिज अवेरनेस इनिशेटिव्ह अॅवॉर्ड जाहिर केला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातून केवळ दोनच व्यक्तींची निवड केली जाते. त्यामध्ये एक पुरस्कार हा फक्त मुंबई प्रांतासाठी आहे तर दुसरा पुरस्कार व उर्वरित महाराष्ट्रातून एकासाठी आहे. उर्वरित महाराष्ट्रातून डॉ.अतुल शिंदे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. डॉ.अतुल शिंदे यांना पुरस्कार जाहिर झाल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील व पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.

