Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Balaji Sherekar
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी अत्यंत अल्प काळात प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका लावला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर दादांनी जिल्ह्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी सुरू केलेले विकासप्रकल्प आणि जिल्ह्याचा कायापालट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार याच योग्य उत्तराधिकारी असल्याचे मत पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्याच्या बालेकिल्ल्यासोबतच आता बीडच्या विकासाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केवळ सरकारमध्येच नाही, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांची पकड आता मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात त्यांच्याकडे पक्षाच्या…
२५ हजारांची लाच स्वीकारताना अंबाजोगाईचा सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अंबाजोगाई: येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडले. एका पतसंस्थेविरुद्धच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी भंडारी याने संबंधित संस्थेच्या सचिवाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या बदल्यात भंडारी यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या…
अंबाजोगाई – सतत विकास कामाचा ध्यास असणारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विकास कामात कधीच राजकारण केले नाही असे मत व्यक्त करून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आज दिनांक 30 जानेवारी रोजी येथील नगर परिषद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे प्रतिमेस पुष्पहार देऊन श्रद्धांजली अर्पण केली . या वेळी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नगरसेवक संजय गंभीरे, गणेश देशमुख, महेश आंबाड, किरण भालेकर, सोनल धायगुडे, श्रीकांत धायगुडे, रचना परदेशी, ऍड.काकडे, महेश लोमटे, सचिन जाधव, संतोष शिनगारे, प्रशांत आदनाक,हिंडलाल काकडे, महादेव आदमाने, बाळासाहेब दौडतले, किशोर परदेशी, अक्षय भूमकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा पुढे…
“अश्रूंनी ओलावलेली शांतता..” दादा, तुमची अनुपस्थिती प्रत्येक टप्प्यावर जाणवेल; आ. नमिता मुंदडा यांची अजित पवार यांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली अंबाजोगाई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच अवघ्या बीड जिल्ह्यासह मुंदडा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. राजकीय भूमिकांच्या पलीकडे जाऊन जपलेले कौटुंबिक नाते आज काळाने कायमचे हिरावून नेले आहे. अजित पवार आणि मुंदडा कुटुंबाचे संबंध हे केवळ राजकीय नव्हते, तर ते भावनिक आणि कौटुंबिक होते. अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना आपले अश्रू अनावर झाले. आपल्या मार्गदर्शकाला आणि पितृतुल्य व्यक्तिमत्वाला गमावल्याच्या भावनेने नमिता मुंदडा यांनी साश्रूनयनांनी आपल्या…
बीड जिल्ह्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या अंबाजोगाई शहरात पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका नवीन पर्वाचा प्रारंभ झाला आहे. Bhsnews.in या नवीन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन अंबा नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी (मुंदडा) काकाजी यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या पोर्टलच्या माध्यमातून आता अंबाजोगाईसह जिल्हाभरातील घडामोडी डिजिटल स्वरूपात तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. मान्यवरांची मांदियाळी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अंबाजोगाईतील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष महादेवजी मस्के साहेब, अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे अध्यक्ष बळीरामजी चोपणे, मार्गदर्शक वैजनाथ भैया देशमुख, शेख रऊफ भाई आणि साजेद सर, अजय भाऊ राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच भारतीय…
अंबाजोगाई: शहराच्या विकासासाठी आणि पालिकेच्या आर्थिक शिस्तीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालयांनी नगर पालिकेचा तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेचा गाडा रुळावर आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यासाठी आता या थकबाकीदार कार्यालयांना नोटीसा धाडण्याचे सत्र सुरू झाले आहे. अंबाजोगाई नगर पालिकेची आर्थिक स्थिती मागील काही वर्षांत खालावली होती. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटी कामगारांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी कारभार हाती घेतल्यापासून सक्त वसुलीवर भर दिला आहे. पालिकेच्या उत्पन्नातूनच कर्मचाऱ्यांचे पगार, शहरातील पथदिव्यांचे बिल, पंप हाऊस, फिल्टर3 हाऊसचा खर्च…
अंबाजोगाई: अंबाजोगाई जवळील बुट्टेनाथ येथील पुलाच्या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रशासकीय लाल फितीत अडकलेले हे काम आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहे. या पुलाचे काम सुरू झाल्याने आगामी पावसाळ्यात अंबाजोगाई आणि डोंगरपट्ट्यातील संपर्क तुटण्याची भीती आता कायमची मिटणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बुट्टेनाथ येथील हा पूल अतिशय जुना झाला असून त्याची उंचीही अत्यंत कमी आहे. यामुळे पावसाळ्यात थोडाही मोठा पाऊस झाला की पुलावरून पाणी वाहू लागते आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. पुलावरून पाणी गेल्यामुळे अंबाजोगाई शहराचा डोंगरपट्ट्यातील येल्डा, कुरणवाडी, चिचखंडी यांसारख्या अनेक गावांसोबतचा संपर्क पूर्णपणे तुटत असे. पावसाळ्यातील या नैसर्गिक…
