Author: BHS News

केज: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या फाईलवर गटविकास अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठांच्या सह्या घेऊन कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तरनळीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी केज पंचायत समितीच्या पाठीमागील एका खोलीत ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. महादेव प्रताप खेडकर (वय ३५, रा. तरनळी, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या शेतजमिनीत नरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरींच्या प्रस्तावावर गटविकास अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मंजुरी मिळवून…

Read More

अंबाजोगाई: शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या मात्र मागील चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नूतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीनंतर पदभार स्वीकारताना दिलेले आश्वासन पूर्ण करत मुंदडा यांनी संक्रांतीच्या सणापूर्वी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी एका महिन्याचा पगार त्यांच्या खात्यात जमा केला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेकडो कामगारांची संक्रांत यामुळे गोड झाली असून, शहरात नगराध्यक्षांच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत होत आहे. नगर परिषदेच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. सणासुदीच्या काळात हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पदभार…

Read More

या प्रदर्शनामध्ये विविध जातींच्या श्वानांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे हस्की, ग्रेट डेन, डोबरमन, लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, जर्मन शेफर्ड, चाऊ-चाऊ, पिटबुल, कॅने कोर्सो अशा देशी-विदेशी आणि आकर्षक जातींचे श्वान पाहायला मिळाले. एकूण १०४ कुत्र्यांचा सहभाग या स्पर्धेत होता. विविध जातींच्या श्वानांमुळे प्रदर्शन अधिक रंगतदार व आकर्षक झाले. या भव्य उपक्रमाचे आयोजन लोकनेते सुनीलकाका लोमटे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा लोमटे, जयदीप चिल्मे, डॉ. शिंदे, अशोक ढगे तसेच संस्थेच्या इतर सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.प्रथम क्रमांकाचे बक्षीस ₹५००० हे मा. लोकांडे सर यांच्या कुत्र्याने पटकावले.द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ₹३००० हे मा.…

Read More

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राज्यातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठीची ऑनलाईन नोंदणीची मुदत आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार होती, मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तांत्रिक कारणांचा विचार करून शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक झाले असले तरी खुल्या बाजारपेठेत मिळणारे भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रांचा मोठा आधार आहे. मात्र, अनेक ठिकाणी नवीन खरेदी केंद्रांना उशिरा मिळालेली मंजुरी, मनुष्यबळाचा…

Read More

बीड:- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्शी घटना बीड बायपासवरील मांजरसुंबा परिसरात मध्यरात्री घडली. पैठणहून आपल्या घराकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार निर्जन स्थळी बंद पडली असता, गस्तीवर असलेल्या

Read More